जेएनएन, मुंबई: मुंबईला जोडण्यासाठी आधी समृद्धी मार्ग सुरू झाला. आता मराठवाडामधील तीन जिल्हांना मुंबईसोबत जोडण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज CSMT ते नांदेड पर्यन्त वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू झाली आहे. जालनापर्यन्त धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिला आहे.
वंदे भारतचा टाइम टेबल!
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT– दुपारी 1.10 वाजता,
- दादर – दुपारी 1.17 वाजता - दुपारी 1.19 वाजता
- ठाणे – दुपारी 1.40 वाजता- दुपारी 1.41 वाजता
- कल्याण – दुपारी 2.04 वाजता - 2.06 वाजता
- नाशिक रोड – दुपारी 4.18 वाजता- दुपारी 4.20 वाजता
- मनमाड जंक्शन – सायंकाळी 5.18 वाजता - सायंकाळी 5.20 वाजता
- छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी 7.05 वाजता- सायंकाळी 7.10 वाजता
- जालना – रात्री 8.50 वाजता-रात्री 8.07 वाजता
- परभणी – रात्री 9.43 वाजता- रात्री 9.45 वाजता
- हुजूर साहिब नांदेड – रात्री 11.50 वाजता
नांदेड ते CSMT
- हुजुर साहिब नांदेड – पहाटे 5.00 वाजता
- परभणी – पहाटे 5,40 वाजता - पहाटे 5.42 वाजता
- जालना – सकाळी 7.20 वाजता - सकाळी 7.22 वाजता
- छत्रपती संभाजीनगर – सकाळी 8.13 वाजता-पहाटे 8.15 वाजता
- मनमाड जंक्शन – सकाळी 9.58 वाजता-सकाळी 10.03 वाजता
- नाशिक रोड – सकाळी 11 वाजता- सकाळी 11.02 वाजता
- कल्याण जंक्शन – दुपारी 1.20 वाजता- दुपारी 1.22 वाजता
- ठाणे – दुपारी 1.40 वाजता-दुपारी 1.42 वाजता
- दादर – दुपारी 2.08 वाजता - दुपारी 2.10 वाजता
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी 2.25 वाजता
- असे आहेत वंदे भारतचे स्टॉपेज !
- वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे स्टॉपेज देण्यात आले आहेत.
