जेएनएन, मुंबई: विकसित महाराष्ट्राची दिशा ठरवत महायुती सरकारने गेल्या वर्षभरात राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या धोरणांमुळे राज्यात शाश्वत विकासाची पायाभरणी मजबूत झाली असून, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी सरकारची तिजोरी पूर्ण क्षमतेने उघडली आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय
बावनकुळे म्हणाले की, गेल्या वर्षभरात बळीराजावर ओढवलेल्या नैसर्गिक संकटांवर सरकारने तातडीने मदतकार्य राबवले. अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमधील नुकसान भरपाई वाढवून ती थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली.पीकविमा योजनांमध्ये सुधारणा करत प्रीमियमचा मोठा हिस्सा सरकारने उचलला. तर
शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून कृषी पंपांसाठी विशेष अनुदान दिल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शेतमाल प्रक्रिया व कृषी मूल्य साखळीत नव्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
महिलांसाठी सुरक्षा व सक्षमीकरण कार्यक्रम
महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने अनेक योजना गतीने राबवले आहेत. स्वयं-सहायता गटांसाठी उपलब्ध कर्जमर्यादेत वाढ आणि नवीन रोजगार प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचा काम केला आहे. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत सुरक्षा, आरोग्य व न्याय या तिन्ही पातळीवर महिलांना तातडीचा प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणा अधिक सक्षम केले असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना स्थिर उपजीविकेची संधी उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात गुंतवणूक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि करिअर संधी विस्तारण्यावर सरकारने विशेष भर दिला.शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अर्ज प्रक्रियेत सुलभीकरण केले आहे.महाविद्यालयांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची वाढ, डिजिटल वर्गखोल्यांचा विस्तार करणे, स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग केंद्रे, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा मोफत वापर उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणण्याचा काम केले आहे.
उद्योग गुंतवणुकीत वाढ
महाराष्ट्राला अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून टिकवण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज, धोरणात्मक सुधारणांमुळे गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
नवीन औद्योगिक धोरणांतर्गत गुंतवणूकदारांसाठी परवाना प्रक्रिया सुलभ करून स्टार्ट-अप आणि एमएसएमई क्षेत्रासाठी अनुदान, करसवलती आणि तांत्रिक मदत देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा: Indigo Flight Cancelled: इंडिगोची देशभरात उड्डाणे ठप्प, 3 दिवसांत 1300 हून अधिक उड्डाणे रद्द
हेही वाचा: शीतल तेजवानी घराच्या झडतीने पार्थ पवारचे पाय खोलात; ईओडब्ल्यूच्या कारवाईने आर्थिक गैरव्यवहार उघड होणार ?
