जेएनएन, मुंबई. Local Body Election 2025, Mumbai BMC Elections: मुंबई महानगर पालिका निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी राजकीय पक्षांनी तयारीला वेग आला आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने मुंबईत ‘अब की बार 100 पार’ नारा दिला आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार पक्षाला मुंबई महापालिकेत 100 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाचे दावे अधिक बुलंद झाले आहेत.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी तर महापालिकेत भाजपला दीडशे 150 पेक्षा जास्त जागा मिळतील, अंदाज वर्तवला आहे. तर महायुतीचा महापौर निश्चित असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.मुंबईत बदल निर्विवाद आहे. नागरिकांचा पाठिंबा महायुतीला स्पष्टपणे दिसतो,” असे चव्हाण यांनी सांगितले आहे.

भाजपच्या या आक्रमक मोहिमेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावध झाली असून त्यांनी भाजपच्या सर्व्हेची चांगलीच टीका केली आहे. “निवडणुकीआधी हवा तयार करण्यासाठी अशा सर्व्हेचा वापर केला जात आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. “सत्ता हाती असली की सर्व्हे आपल्या मनासारखे वळवता येतात. त्यामुळे भाजपचे सर्व्हे विश्वसनीय नसतात.”अशी टीका ठाकरे सेनाने केली आहे.

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत पालिका असल्याने या निवडणुकीची प्रतिष्ठा आणि राजकीय महत्व मोठं आहे. गेल्या काही वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेला भाजप यंदा महापालिकेवर कब्जा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनाही आपली संघटना, प्रचार आणि जनसंपर्क मोहिम अधिक मजबूत करत आहे. आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये चुरस वाढणार आहे.

हेही वाचा: भाजपचा सर्वे 100 जागा मिळण्याचा दावा;राज ठाकरेची साथ सोडा,काँग्रेसची उद्धव ठाकरे यांना ऑफर!