जेएनएन, मुंबई: राज्यातील सुमारे 80 हजार सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळांनी 5 डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळला. 2024 च्या संच मान्यता धोरणाला विरोध आणि टीईटी परीक्षेसंदर्भातील वाढत्या गोंधळावर निषेध व्यक्त करण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हा बंद पुकारला आहे.
संच मान्यता धोरणावर शिक्षकांचा आक्षेप
नवीन संच मान्यता धोरणामुळे शाळांच्या मान्यतेप्रक्रियेत वाढलेली कागदपत्रांची क्लिष्टता दूर करावी.शिक्षक भरतीवर होणारा परिणाम दूर करावा.मनुष्यबळ तुटवड्यामुळे शाळा चालवताना येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढावा.यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर होणारा प्रतिकूल प्रभाव होत आहे असे अनेक मुद्दे शिक्षक संघटनांनी मांडले आहेत. संघटनांचे म्हणणे आहे की नवीन धोरण शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून, ग्रामीण भागातील शाळांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
टीईटी परीक्षेतील गोंधळामुळे शिक्षक नाराज
टीईटी परीक्षा राबविण्याच्या प्रक्रियेमध्ये गोंधळ वाढला आहे.परीक्षेच्या तारखा बदलणे यामुळे शिकवणीवर परिणाम होत आहे.
पात्रतेसंदर्भातील अनिश्चितता, निकालांमधील विसंगती या सर्व कारणांमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षक संघटनांनी सरकारकडे टीईटी प्रणाली अधिक पारदर्शक, निश्चित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची भूमिका स्पष्ट
शाळा बंद असल्या तरी अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधीच माहिती देऊन अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या सूचना पाठवले आहेत. "आमचे आंदोलन विद्यार्थ्यांवर नव्हे, तर चुकीच्या धोरणांवर आहे," असे संघटनांचे म्हणणे आहे.
सरकारकडे चर्चा मागणी
शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे तात्काळ. संच मान्यता धोरणाचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.दरम्यान टीईटी प्रक्रियेत सुधारणा करून शिक्षक भरती आणि मान्यता प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी बैठकची औपचारिक मागणी केली आहे.
हेही वाचा: उद्धव ठाकरे 14 डिसेंबरला दिल्ली दौऱ्यावर? इंडिया आघाडीच्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता
