जेएनएन, मुंबई: सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. दिवाळीपूर्वी या मार्गावर उड्डाणे सुरू होणार आहेत. 15 ऑक्टोबर 2025पासून ही सेवा उपलब्ध होणार असून उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ही सेवा स्टार एअर कंपनीमार्फत सुरू करण्यात येणार आहे . आठवड्यातील चार दिवस  मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार — उड्डाणे होणार आहेत.

असा असेल वेळापत्रक!

सोलापूर ते मुंबई - दुपारी 12.55

मुंबई ते सोलापूर - दुपारी 02.45

याशिवाय सोलापूर-बंगळुरू मार्गावरही सेवा सुरू होणार आहे.सोलापूर विमानतळाचे गेल्या वर्षी सुमारे ६० कोटींमध्ये नूतनीकरण करण्यात आले होते. सध्या विमानतळ वरून  गोव्याला नियमित उड्डाणे सुरू आहेत. नवीन मुंबई आणि बंगळुरू मार्गामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.यामध्ये प्रवासाची वेळ आणि खर्च कमी होणार आहे.

या विमानसेवेच्या माध्यमातून व्यवसाय, शिक्षण, पर्यटन व धार्मिक क्षेत्रांना चालना मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळून रोजगार संधी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.