जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. काल मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केली आहे. योजनेनुसार, पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटीद्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी ₹3,690 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वाढीव रक्कम ₹2,000 रुपये करण्याबाबत राज्य सरकार लवकरच अर्थसंकल्पात तरतूद करणार आहे. वाढीव योजनेचा लाभ राज्यातील महिलांना फेब्रुवारीनंतर मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूद करेल, अशी माहिती महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.