जेएनएन, मुंबई: पश्चिम रेल्वेने 24,25आणि 26 जानेवारीला'जम्बो मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने हा मेगाब्लॉक रात्री ठेवला आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. वेस्टर्न रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

मेगाब्लॉकमुळे, शुक्रवार आणि शनिवारी रात्री 127  उपनगरीय सेवा रद्द केले जाणार आहे. शनिवार 150 उपनगरीय लोकल सेवा तर रविवारी रात्री 60  उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहे. 24  जानेवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30  वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्टेशन दरम्यान धीम्या गतीच्या मार्गावर परिवर्तीत केले जाणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर देखील रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30  वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटणार आहे.रात्री ११ वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर परिवर्तीत करणार आहे. दरम्यान महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकलचा थांबा रद्द केले जाणार आहे.

असा असणार आहे वेळापत्रक !

  • सकाळी 6.14 वाजता चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सुटणार आहे. 
  • -24 जानेवारीला रात्री 11वाजता नंतर विरार, भाईंदर आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या स्लो गाड्या सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावणार आहे. 
  • - गोरेगाव आणि वांद्रे,पश्चिम रेल्वे लोकल हार्बर मार्गावर धावणार आहे. 
  • -25 जानेवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली स्लो आणि फास्ट लोकल अंधेरी स्थानकवर थांबणार आहे. 
  • -मेगाब्लॉकनंतर चर्चगेटकडे येणारी पहिली फास्ट लोकल शनिवारी सकाळी 5.47 वाजता विरारहून सुटणार असून सकाळी 7.05 वाजता पोहचणार आहे. 
  • - चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सकाळी 6.14 वाजता सुटेल आणि चर्चगेटवरून पहिली डाउन स्लो लोकल ब्लॉकनंतर सकाळी 8.03 वाजता सुटेल.

या लांब पल्ल्याच्या गाड्यां रद्द असणार आहेत!

  • 12227 Mumbai Central–Indore Duronto Express (25th January 2025)
  • 12268 Hapa-Mumbai Central Duronto Express (26th January 2025)
  • 09052 Bhusaval–Dadar Special (25th January 2025) – Short terminates at Borivali.
  • 12267 Mumbai Central–Hapa Duronto Express (25th January 2025)
  • 12228 Indore-Mumbai Central Duronto Express (26th January 2025)
  • 19003 Dadar–Bhusaval Khandesh Express (26th January 2025) – Short originates from Borivali.
  • 19015 Dadar–Porbandar Saurashtra Express (26th January 2025) – Short originates from Borivali.
  • 22946 Okha–Mumbai Central Saurashtra Mail (25th January 2025) – Short terminates at Borivali.
  • 12927 Dadar–Ekta Nagar Superfast Express (25th January 2025) – Short originates from Borivali.
  • 12902 Ahmedabad–Dadar Gujarat Mail (25th January 2025) – Short terminates at Palghar.
  • 59024 Valsad–Mumbai Central Passenger (26th January 2025) – Short terminates at Borivali.
  • 59045 Mumbai Central–Vapi Passenger (26th January 2025) – Short originates from Borivali.
  • 19016 Porbandar–Dadar Saurashtra Express (24th January 2025) – Short terminates at Borivali.
  • 12904 Amritsar–Mumbai Central Golden Temple Mail (24th January 2025) – Short terminates at Andheri.