जेएनएन, मुंबई: रत्नागिरीत भाजपच्या महायुती एकजुटीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मोबाईल स्टेटसबाबत काही कार्यकर्त्यांकडून चर्चा रंगू लागल्यानंतर, पक्षांतर्गत शिस्त आणि महायुतीची निष्ठा टिकवण्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट सूचना दिले आहे.कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा धर्म भंग होऊ देणार नसल्याचा ठाम संदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात चव्हाण यांनी एकत्र राहण्याचे संदेश दिला आहे.चव्हाण यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडू नये, सोशल मीडिया स्टेटस किंवा पोस्ट पाहून भ्रमित होऊ नये. महायुतीच्याच धोरणाशी निष्ठा राखण्याचे आवाहन केले चव्हाण यांनी केले आहे. राजकारणात शिस्त, निष्ठा आणि समन्वय हे महत्त्वाचे असून, कोणताही कार्यकर्ता महायुतीला नुकसान पोहोचवेल अशा वागणुकीत सहभागी होऊ नये असा संदेश दिला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. सामंत यांनी स्पष्ट केले की रत्नागिरीतील निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून महायुतीला विजयाकडे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम केले पाहिजे.

महायुतीच्या उमेदवारांना मजबूत आधार देण्यासाठी आगामी दिवसांत बूथस्तरावर संघटन बळकट करण्याचेही निर्णय घेण्यात आले. रत्नागिरीतील राजकीय वातावरण तापत असताना, भाजपा नेतृत्वाकडून दिलेला हा सज्जड इशारा कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देणारा ठरला आहे.