जेएनएन, मुंबई. Weather Update Today: महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी विविध येलो आणि रेड अलर्ट जारी केले आहे. राज्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट!
राज्यात अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडत आहे. कोकण आणि घाटमाथ्याच्या जोरदार पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि कोल्हापूर, सातारा या घाटमाथ्याच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या भागांसाठी हवामान विभगाने रेड अलर्ट जारी केला आहे.

विदर्भ आणि इतर भागांसाठी ऑरेंज व यलो अलर्ट!
विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट, तर काही भागांसाठी यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

मुंबईत चार दिवस भरतीचा इशारा!
मुंबई आणि उपनगरांमध्येही जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील चार दिवस धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. 26 जुलै रोजी समुद्रात 4.67 मीटर उंच लाटा उसळणार असल्याने, नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे, मासेमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

चक्रीवादळाची शक्यता!
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, 'विफा' चक्रीवादळाचे संकेत मिळत आहेत.

अरबी समुद्राच्या ईशान्य भागात, गुजरातच्या दक्षिण भागात आणि आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने, महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

पुराची स्थिती निर्माण होऊ शकते
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा 27 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलैदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा: गुडन्यूज! अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, 337 कोटी रुपये मंजूर