जेएनएन, मुंबई. BMC Mayor: मुंबई महापालिकेच्या (BMC) नव्या सभागृहात यंदा महिलांचा दबदबा स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी सुमारे 60 टक्के नगरसेवक महिला असल्याचं चित्र समोर आल आहे.आगामी काळात बीएमसी सभागृहात तब्बल 135 महिला नगरसेवक कार्यरत असतील. यामुळे महिलाच महापौर होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

227 नगरसेवकांच्या पूर्ण सभागृहात यावेळी 114 जागा महिलांसाठी आरक्षित होते. मात्र आरक्षित जागांपुरताच महिलांचा विजय मर्यादित राहिला नाही. तर आरक्षणाबाहेरील अनेक जागांवरही महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना पराभूत करत विजय मिळवला, त्यामुळे महिलांची एकूण संख्या थेट 135 वर पोहोचली आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा 6 महिलांची वाढ झाली असून, हा आकडा मुंबईच्या राजकारणात महिलांची वाढती ताकद अधोरेखित करणारा ठरत आहे. रस्त्यापासून सभागृहापर्यंत महिलांनी केलेली आक्रमक प्रचारयंत्रणा, स्थानिक प्रश्नांवर केलेला ठोस संपर्क आणि संघटनात्मक ताकद याचा फायदा अनेक महिला उमेदवारांना झाला.या निकालामुळे बीएमसीच्या कारभारात महिलांचा दृष्टिकोन अधिक प्रभावीपणे उमटण्याची शक्यता आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला व बालकल्याण, सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर आता सभागृहात अधिक संवेदनशील चर्चा होणार आहे.

हेही वाचा: BMC Election Result 2026: 20 वर्षांनी ते एकत्र आले, तरीही ते अयशस्वी; ठाकरे बंधूंची युती तरीही पराभव का?