जेएनएन, नागपुर. Mother’s Day 2026 Wishes: आई… हा शब्द उच्चारताच मायेचा, त्यागाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा अनुभव मनाला स्पर्शून जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान अनमोल असते. तिच्या प्रेमाची आणि कष्टांची कदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘मातृदिन’ (Mother’s Day) जगभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदाही आज, रविवारी १० मे रोजी मातृदिनानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक जण आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
आई ही मुलांची पहिली गुरु असते. मुलांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ती आयुष्यभर कष्ट करत असते. तिच्या त्याग, प्रेम आणि मायेबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. अनेकजण आईला भेटवस्तू देऊन, खास संदेश पाठवून किंवा तिच्यासोबत वेळ घालवून हा दिवस साजरा करतात. तुम्ही देखील हे सुंदर शुभेच्छा संदेश पाठवून आजचा दिवस खास बनवू शकता.
- आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर,
तुझ्या मायेच्या सावलीतच आयुष्य सुंदर वाटतं.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- जगातलं सर्वात निस्वार्थ प्रेम म्हणजे आईचं प्रेम.
तुझ्या प्रत्येक त्यागासाठी मनापासून धन्यवाद आई!
- आई, तुझ्या एका हसण्यात माझं संपूर्ण जग दडलं आहे.
तू कायम आनंदी राहो हीच प्रार्थना.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
- देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही,
म्हणून त्याने “आई” निर्माण केली.
मातृदिनाच्या शुभेच्छा!
- माझ्या प्रत्येक यशामागची खरी ताकद म्हणजे माझी आई.
तुझा आशीर्वाद असाच कायम राहू दे.
- आईच्या मायेची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.
तुझं प्रेम आयुष्यभर असंच मिळत राहो.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- आई, तू आहेस म्हणूनच आयुष्य सुंदर आहे.
तुझ्याशिवाय प्रत्येक आनंद अपूर्ण आहे.
मातृदिनाच्या शुभेच्छा!
- आई म्हणजे घराचा आधार,
प्रेमाचा झरा आणि आयुष्याची खरी प्रेरणा.
माझ्या प्रिय आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!
- आई तुझं प्रेम म्हणजे आयुष्याला मिळालेलं सर्वात सुंदर वरदान.
तू कायम हसत राहो, आनंदी राहो.
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- तुझ्या मायेच्या उबेत प्रत्येक दुःख हलकं वाटतं आई.
तुझ्यासारखं निस्वार्थ प्रेम जगात कुठेच नाही.
- आई, तू माझी पहिली मैत्रीण, पहिली गुरु आणि आयुष्यभराची प्रेरणा आहेस.
तुझ्यावर खूप प्रेम!
- माझ्या प्रत्येक चुकांना माफ करून योग्य मार्ग दाखवणाऱ्या आईला
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
