जेएनएन, मुंबई. Buddha Purnima 2026 Wishes:देशभरात बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2026)मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा दिवस गौतम बुद्ध (Goutam Budhha) यांच्या जीवनातील तीन महत्त्वाच्या घटनांशी संबंधित आहे. इतिहासानुसार, याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. तसेच बोधगया येथे त्यांनी ध्यान करत असताना ज्ञानप्राप्ती केली आणि ‘बुद्ध’ म्हणजेच ‘ज्ञानप्राप्त’ झाले. याशिवाय, कुशीनगर येथे त्यांचे महापरिनिर्वाणही याच दिवशी झाल्याचे मानले जाते. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
या दिवशी बौद्ध बांधव विहारांमध्ये जाऊन प्रार्थना करतात, बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करतात आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प करतात. अनेक ठिकाणी ध्यानसत्रे, प्रवचने आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या शुभ दिली तुमच्या प्रियजनना हे शुभेच्छा संदेश पाठवून द्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
- बुद्धांच्या शांततेचा आणि करुणेचा प्रकाश तुमच्या आयुष्यात सदैव उजळत राहो. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- अहिंसा, प्रेम आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांच्या विचारांनी तुमचे जीवन समृद्ध होवो. बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
- शांती, संयम आणि सद्भावनेचा संदेश देणारी ही बुद्ध पौर्णिमा तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो. हार्दिक शुभेच्छा!
- भगवान बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा मिळो, आणि प्रत्येक क्षण आनंदी जावो. बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
- मनःशांती, समाधान आणि सकारात्मकतेने भरलेले जीवन लाभो, हीच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला शुभेच्छा!
- बुद्धांच्या ज्ञानप्रकाशाने तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होवो. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- बुद्धांच्या करुणेचा स्पर्श आणि शांततेचा सुगंध तुमच्या आयुष्यात दररोज दरवळत राहो. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- दुःखावर मात करून आनंदाचा मार्ग दाखवणाऱ्या बुद्धांच्या विचारांनी तुमचे जीवन उजळून निघो. शुभ बुद्ध पौर्णिमा!
- राग, द्वेष आणि मत्सर दूर करून प्रेम, शांती आणि समाधानाने जीवन फुलवूया. बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
- शांत मन, निरोगी विचार आणि सकारात्मक जीवनशैलीची देणगी ही बुद्ध पौर्णिमेने तुम्हाला लाभो. हार्दिक शुभेच्छा!
- बुद्धांच्या शिकवणीतून मिळणारी संयमाची ताकद आणि सत्याची वाट तुमच्या आयुष्यात नवे यश घेऊन येवो. बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
- प्रेम, करुणा आणि मैत्रीचा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजवूया. याच भावनेने बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
- जीवनात शांती आणि संतुलन राखण्याची प्रेरणा देणारी ही पवित्र बुद्ध पौर्णिमा तुम्हाला सुख-समृद्धी देवो. हार्दिक शुभेच्छा!
- बुद्धांच्या विचारांनी मनातील सर्व अशांतता दूर होवो आणि आयुष्य आनंदमय बनो. बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
- प्रत्येक क्षणात समाधान शोधण्याची कला बुद्धांनी शिकवली, ती तुमच्या आयुष्यात उतरू दे. मंगलमय बुद्ध पौर्णिमा!
- ज्ञान, शांती आणि करुणेचा दीप आपल्या आयुष्यात सदैव प्रज्वलित राहो. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
