जेएनएन, मुंबई. Shivaji Maharaj Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांची कीर्ती सातासमुद्रापार पसरली होती. आणि आज 350 वर्षांनंतरही त्यांच्या कीर्तीचे गुण गेले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणारा असाच एक जयघोष म्हणजे महाराजांची 'गारद' जी आजही मराठी माणसाच्या मनात कोरली आहे. महाराजांची गारद एकताच प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून येते. अश्या या गारदचा नेमका अर्थ काय. त्यात वापरले जाणारे मोठे मोठे  शब्द काय सांगतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. 


गारद म्हणजे काय?

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद म्हणजे महाराज त्यांच्या दरबारात प्रवेश करताना जी ललकारी दिली जायची त्याला गारद असे म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम

महाराsssssज

गडपती

    गजअश्वपती

    भूपती

    प्रजापती

    सुवर्णरत्नश्रीपती

    अष्टवधानजागृत

    अष्टप्रधानवेष्टित

    न्यायालंकारमंडित

    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत

    राजनितिधुरंधर

    प्रौढप्रतापपुरंदर

    क्षत्रियकुलावतंस

    सिंहासनाधिश्वर

    महाराजाधिराज

    राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.

    गडपती- राज्यातील गडकोटांवर ज्यांचे राज्य आहे गडांचे अधिपती महाराज 

    गजअश्वपती- ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज.

    भूपती प्रजापती- ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण आणि पालन करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.

    सुवर्णरत्नश्रीपती- राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण यावर ज्यांचे आधिपत्य आहे असे महाराज. 

    अष्टावधानजागृत- आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.

    अष्टप्रधानवेष्टीत- ज्यांच्याकडे प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.

    न्यायालंकारमंडीत- कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.

    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत- सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत असलेले महाराज. 

    हेही वाचा:Happy Shiv Jayanti 2025 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या संदेशांनी द्या आपल्या प्रियजनांना शुभेच्छा

    राजनितीधुरंधर- राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज.

    प्रौढप्रतापपुरंदर- मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.

    क्षत्रियकुलावतंस- क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज.

    सिंहासनाधिश्वर-  32 मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.

    महाराजाधिराज- सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.

    राजाशिवछत्रपती- ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

    हेही वाचा:Shiv Jayanti 2025: NCP कडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत 'स्वराज्य सप्ताहा' चे आयोजन, वाचा सविस्तर कार्यक्रम