जेएनएन, मुंबई. Marathi Sahitya Sammelan 2025:  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आज 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत पार पडत आहे. 1878 साली पहिल्यांदा न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पुण्यात पडले होते. तेव्हापासून हे साहित्य संमेलन आयोजित केले जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरवात कशी झाली. काय आहे त्याचा इतिहास, हे साहित्य संमेलन भरविण्यामागचे उद्दिष्ट काय आणि आणि अशी बरीच प्रश्न तुमच्याही मनातच असतीलच आज 98 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणार आहोत. 

पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन 
मराठी भाषेत अनेक साहित्य प्रकाशित झाले आहे. अनेक मोठ मोठ्या साहित्यिकांनी मराठी भाषेला समृद्ध असा वारसा मिळवून दिला आहे. मराठीतील हेच साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे त्याची चर्चा व्हावी व येणाऱ्या पिढीला या साहित्या विषयी आकर्षण वाटावे या ऊद्देशाने न्या.रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 

ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. 11 मे 1878 रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. ज्याचे अध्यक्षपद न्या.रानडे यांनी भूषविले. याच संमेलनाला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. 

या संमेलनाच्या यशस्वीतेनंतर 1885 साली पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरल्याचे सांगितले जाते. त्यांनतर पुढे 20 वर्षांनी मे 1905 मध्ये सातारा येथे सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर  यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे साहित्य संमेलन व मे 1906 मध्ये सदाशिव पेठेत गोविंद वासुदेव कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांचे चौथे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.  या संमेलनांना त्यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलन असे न संबोधता ग्रंथकार संमेलन असे संबोधण्यात आले होते.


मराठी साहित्य महामंडळाची स्थापना
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यांनतर मराठी साहित्य महामंडळाची स्थापना करण्यात आली. मराठी साहित्य महामंडळात राज्यातील चार प्रदेशात काम करणाऱ्या संस्था म्हणजे पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि  विदर्भ साहित्य संघ नागपूर एकत्र येऊन मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्यात आले. मराठी साहित्य महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. मराठी साहित्य महामंडळाच्या महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या 350 शाखा असून, 12 हजाराच्यावर सभासद आहेत. 

1960 पर्यंत पुण्याची साहित्य परिषद साहित्य संमेलन भरवत होते आणि यांना महाराष्ट्र साहित्य संमेलन असे संबोधले जात होते. मात्र महामंडळाच्या स्थापनेनंतर मडगावमध्ये 1946  रोजी भरललेया 45 व्या साहित्य संमेलनात निर्णय घेण्यात आला की, दरवर्षी किमान एक तरी साहित्य संमेलन घेण्यात यावे. व याच बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले.

हेही वाचा:Marathi Sahitya Sammelan 2025: पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

दिल्लीतील 98 वे साहित्य संमेलन

दिल्लीत 1954 साली झालेल्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ तर या संमेलनाचे उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते.  1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आता 70 वर्षांनी नवी दिल्लीत साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.


आतापर्यंत झालेली साहित्य संमेलन त्यांचे ठिकाण आणि संमेलनाध्यक्ष 

    संमेलनवर्षेठिकाणअध्यक्ष
    11878पुणेन्या. महादेव गोविंद रानडे
    21885पुणेकृष्णशास्त्री राजवाडे
    31905सातारारघुनाथ पांडूरंग करंदीकर
    41906पुणेवासुदेव गोविंद कानिटकर
    51907पुणेविष्णू मोरेश्वर महाजनी
    61908पुणेचिंतापण विनायक वैद्य
    71909बडोदेकान्होबा रामछोडदास किर्तीकर
    81912अकोलाहरी नारायण आपटे
    91915मुंबईगंगाधर पटवर्धन
    101917इंदूरगणेश जनार्दन आगाशे
    111921बडोदेनरसिंह चिंतामण केळकर
    121926मुंबईमाधव विनायक किबे
    131927पुणेश्रीपाद कृष्ण कोल्हटकर
    141928ग्वाल्हेरमाधव श्रीहरी अणे
    151929बेळगावशिवराम महादेव परांजपे
    161930मडगाववामन मल्हार जोशी
    171931हैद्राबादश्रीधर व्यंकटेश केतकर
    181932कोल्हापूरसयाजीराव गायकवाड
    191933नागपूरकृष्णाजी प्रभाकर खांडिलकर
    201934बडोदेनारायण गोविंद चापेकर
    211935इंदूरभवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
    221936जळगावमाधव जुलियन
    231938मुंबईविनायक दामोदर सावरकर
    241939अहमदनगरदत्तो वामन पोतदार
    251940रत्नागिरीनारायण सिताराम फडके
    261941सोलापूरविष्णू सखाराम खांडेकर
    271942नाशिकप्रल्हाद केशव अत्रे
    281943सांगलीश्रीपाद महादेव माटे
    291944धुळेभार्गवराव विठ्ठल वरेरकर
    301946बेळगावगजानन त्र्यंबक माडखोलकर
    311947हैद्राबादनरहर रघुनाथ फाटक
    321949पुणेशंकर दत्तात्रय जावडेकर
    331950मुंबईयशवंत दिनकर पेंढारकर
    341951कारवारअनंत काकबा प्रियोळकर
    351952अमळनेरकृष्णाजी पांडूरंग कुलकर्णी
    361953अमदाबादविठ्ठल दत्तात्रय घाटे
    371954दिल्लीलक्ष्मणशास्त्री बाळजी जोशी
    381955पंढरपूरशंकर दामोदर पेंडसे
    391957औरंगाबादअनंत काणेकर
    401958मालवणअनिल
    411959मिरजश्रीकृष्ण केशव क्षीरसागर
    421960ठाणेरामचंद्र श्रीपाद जोग
    431961ग्वाल्हेरकुसुमावती देशपांडे
    441962सातारानरहर विष्णु गाडगीळ
    451964मडगाववि. वा. शिरवाडकर
    461965सातारावामन लक्ष्मण कुलकर्णी
    471967भोपाळविष्णु भिकाजी कोलते
    481969वर्धापु. शि. रेंगे
    491973यवतमाळगजानन दिगंबर माडगुळकर
    501974इचलकरंजीपु. ल. देशपांडे
    511975कराडदुर्गा भागवत
    521977पुणेपु. भा. भावे
    531979चंद्रपूरवामन कृष्ण चोरघडे
    541980बार्शीगं. बा. सरदार
    551981 (फेब्रुवारी)अकोलागो. नी. दांडेकर
    561981 (डिसेंबर)रायपूरगंगाधर गाडगीळ
    571983अंबेजोगाईव्यंकटेश दिगंबर माडगुळकर
    581984जळगावशंकर रामचंद्र खरात
    591985नांदेडशंकर बाबाजी पाटील
    601988मुंबईविश्राम बेडेकर
    611988ठाणेवसंत कानेटकर
    621989अमरावतीकेशव जगन्नाथ पुरोहित
    631990 (जानेवारी)पुणेयु. म. पठाण
    641990 (डिसेंबर)रत्नागिरीमधु मंगेश कर्णिक
    651992कोल्हापूररमेश मंत्री
    661993साताराविद्याधर गोखले
    671994पणजीराम शेवाळकर
    681995परभणीनारायण सुर्वे
    691996आळंदीशांता शेळके
    701997अहमदनगरना. स. इनामदार
    711998परळी वैजनाथद. मा. मिरासदार
    721999मुंबईवसंत बापट
    732000बेळगावय. दि. फडके
    742001इंदूरविजया राजाध्यक्ष
    752002पुणेराजेंद्र बनहट्टी
    762003कराडसुभाष भेंडे
    772004औरंगाबादरा. ग. जाधव
    782005नाशिककेशव मेश्राम
    792006सोलापूरमारुती चित्तमपल्ली
    802007नागपूरअरुण साधू
    812008सांगलीम. द. हातकणंगलेकर
    822009महाबळेश्वरआनंद यादव
    832010पुणेद. भि. कुलकर्णी
    842010 (डिसेंबर)ठाणेउत्तम कांबळे
    852012चंद्रपूरवसंत आबाजी डहाके
    862013चिपळूणनागनाथ कोत्तापल्ले
    872014सासवडफ. मुं. शिंदे
    882015घुमान (पंजाब)संदानंद मोरे
    892016पिंपरी चिंचवडश्रीपाल सबनीस
    902017डोंबिवलीअक्षयकुमार काळे
    912018बडोदेलक्ष्मीकांत देशमुख
    922019यवतमाळअरुणा ढेरे
    932020उस्मानाबादफादर फ्रान्सिस
    942021नाशिकजयंत नारळीकर
    952022उदगीरभारत सासणे
    962023वर्धान्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
    972024अमळनेररविंद्र शोभणे