जेनएन, मुंबई: संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा' या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. आता लवकरच या कॉमेडी चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच 'येरे येरे पैसा ३' देखील प्रदर्शित होणार आहे. आज होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'येरे येरे पैसा 3' येत्या 18  जुलै 2025  रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता उमेश कामत, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, आनंद इंगळे, जयंत वाडकर अभिनेत्री तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, वनिता खरात यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'येरे येरे पैसा ३' या चित्रपटाचे दिगदर्शन व कथा संजय जाधव यांची असून, सुधीर कोलते, ओंकार माने, अमेय खोपकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहेत. तसेच या चित्रपटाचे डायलॉग अरविंद जगताप यांनी लिहिले आहे. 

रिलिज करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये संजय नार्वेकर आणि संजय जाधव यांची कॉमेडी पाहायला मिळत आहे. तर चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले आदित्य आणि बबली म्हणजेच उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित देखील त्यांच्या डॅशिंग लुकमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टायटल सॉन्ग 'आला एक्का.. त्यावर दुर्री..डाव होतो जेव्हा येते तिर्री.. बोला..' ‘येरे येरे पैसा 3’ची झलक देखील दाखविण्यात आली आहे.

या चित्रपटाचे ट्रेलर अभिनेता उमेश कामतने त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. शेअर केलेल्या या पोस्टबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आला एक्का.. त्यावर दुर्री..डाव होतो जेव्हा येते तिर्री.. बोला.. ‘येरे येरे पैसा 3’
18जुलैपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!


चित्रपटाच्या आधीच्या दोन भागांप्रमाणेच तिसऱ्या भागात देखील प्रेक्षकांना खळखळून हसविण्याची टाकत आहे की, नाही हे तर आता चित्रपटगृहात गेल्यावरच कळेल.