जेएनएन, मुंबई: मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपट सृष्टीतील नवख्या कलाकारांसोबतच ज्येष्ठ व अनुभवी कलाकार देखील आता चित्रपटांमध्ये सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. गेल्या काही चित्रपटांमध्ये अनेक जेष्ठ कलाकारांची हजेरी आपण पहिली आहे. अश्यातच भर पडली आहे. ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांची या अनुभवी कलाकाराची मुख्य भूमिका असलेला 'आतली बातमी फुटली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षलकांच्या भेटीला येत आहे.
नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून, या चित्रपटात मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. रिलीज करण्यात आलेल्या या टिझरमध्ये सिद्धार्थ जाधव एका शार्प शूटरच्या भूमिकेत दिसत असून, सुरवातीलाच त्याच्या मागे पोलीस पळताना दिसत आहे. तर मोहन आगाशे एका व्यक्तीला त्यांच्या बायकोला मारण्याची सुपारी देतात. त्यात ते मारायला आलेल्या शार्प शूटरला म्हणजेच सिद्धार्थ जाधवला बायकोला मारण्याच्या 4 स्टेप्स सांगताना दिसत आहे. बायकोला मारण्याच्या या स्टेप्स दरम्यान प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट येत्या 6 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, चित्रपटात मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका असून, चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल गांधी आणि जैनेश इनामदार यांनी केले आहे. तर निर्मिती विशाल गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी चित्रपटाचे संवाद लेखन जीवक मुनतोडे आणि अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे.