जेएनएन, मुंबई.Sandhya Shantaram Death: मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संध्या शांताराम या चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या. संध्या यांनी मराठीत गाजलेला 'पिंजरा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याव्यतिरिक्त हिंदी मध्ये देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या ज्या प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.
हिंदी मध्ये संध्या त्यांनी 'अरे जा रे हट नटखट' या अजरामर गीतात दुहेरी भूमिका साकारली होती. या गाण्यसाठी त्या शास्त्रीय नृत्य देखील शिकल्या होत्या. कुठ्ल्याही नृत्य दिग्दर्शकाची मदत न घेता. त्यांनी या गीतासाठी प्रचंड मेहनत केली होती. 'दो आंखे बारह हाथ', 'नवरंग' सारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका देखील विशेष गाजल्या.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून याबाबतची माहिती देत. त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, भावपूर्ण श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 4, 2025
‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह… pic.twitter.com/Gsdq5KuXP9
‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !
संध्या शांताराम यांचा प्रवास
संध्या शांताराम या दिवंगत दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र छाप निर्माण केली. 1955 सालच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटातून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. दो आंखें बारह हाथ (1958) या क्लासिक चित्रपटात त्यांच्या अभिनयाने रसिक मंत्रमुग्ध झाले. 1959 मधील नवरंग या चित्रपटातील त्यांच्या दुहेरी भूमिकेने त्यांची ख्याती शिखरावर पोहोचवली. 1972 साली प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा पिंजरा हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेला चित्रपट मानला जातो. यात त्यांनी लावणी नृत्यकौशल्याने मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनयासोबतच नृत्य आणि अभिव्यक्तीला नवा आयाम दिला.