जेएनएन, मुंबई : मराठी चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा बहुप्रतिक्षित ‘आशा’ हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचा फर्स्ट-लुक आणि क्रिएटिव्ह टीमची माहिती जाहीर होताच सोशल मीडियावर उत्सुकता वाढली आहे.
दीपक पाटील दिग्दर्शित हा चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा रंगवणार असून, निर्मितीची धुरा दैवता चव्हाण पाटील आणि निलेश कुवार यांनी सांभाळली आहे. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सुरेश सारंगम, तर कथालेखन दास्तानगोई यांनी केले आहे. सहलेखक म्हणून दिग्दर्शक दीपक पाटील आणि निलेश कुवार यांचाही सहभाग आहे.
चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत साईकांत कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास सिरसट, दिक्षा डाणे, दिलिप घेरे, हर्ष गुप्ते, रूपेश खरे, राजन पवार, भूमिका देसाले यांसारखी दमदार कलाकारांची फळी झळकणार आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून अशा सेविका म्हणून काम करणाऱ्या असंख्य महिलांची काही रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 19 डिसेंबर 2025 मध्ये रिलीज होणारा ‘आशा’ चित्रपट रिंकू राजगुरूच्या अभिनयासह कथानक व तांत्रिक बाजूंच्या मजबूत सादरीकरणामुळे वर्षअखेरीस प्रेक्षकांसाठी एक खास सिनेमॅटिक अनुभव ठरणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
