जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात होणार आहे. लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशीची (Jitendra Joshi) मुख्य भूमिका असलेला ‘मॅजिक’ हा सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट (Psychological thriller movie) 1 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, याचे अधिकृत पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
पोस्ट शेअर करताना जितेंद्र जोशीने आपल्या चाहत्यांना उद्देशून लिहिले, “आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो अखेर आला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘मॅजिक’चे (Magic) अधिकृत पोस्टर सादर करत आहोत.”
तसेच या चित्रपटाबाबतची भावना व्यक्त करत त्याने म्हटले, “हा चित्रपट मनातील, भीतीतील, सत्यातील आणि वास्तव व भ्रमातील प्रत्येक गोष्टीतील प्रवास आहे. ही कथा मराठी प्रेक्षकांसमोर आणि काहीतरी धाडसी, नवीन व अविस्मरणीय अनुभव शोधणाऱ्या प्रत्येकासाठी आणताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. मॅजिकची उलटी गिनती आता सुरू होते.”
‘मॅजिक’ (Magic) हा विषय आणि मांडणीच्या दृष्टीनं वेगळा प्रयोग असणार असून, मराठी प्रेक्षकांना थरार, मानसिक संघर्ष आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला अनुभव देण्याची निर्मात्यांची तयारी आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रिलीज होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती ‘मॅजिक’ दाखवतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Aamir Khan च्या नवीन चित्रपटाची घोषणा, नायक आणि नायिका पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
