जेएनएन, मुंबई: होळीचा सण आज संपूर्ण देशभरता साजरा केला जात आहे. 13 मार्च रोजी झालेल्या होलिका दहन नंतर आज धुळवळ उत्साहात साजरी करण्यात आली. होळीच्या रंगात संपूर्ण देशवासी रंगून गेले होते. अश्यातच मराठी मनोरंजन सृष्टितीतून देखील असेच काही फोटो समोर आले. मराठी कलाकारांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबासोबत होळी साजरी केली.
अनके कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर धुळवळचे फोटो शेअर केले आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया सोबतच एक फोटो शेअर केला आहे ज्यात दोघेही होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहे. आदेश बांदेकर यांनी देखील सोशल मीडियावरून फोटो शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नील जोशीने देखील एका कार्यक्रमात त्याच्या चाहत्यांसोबत होळी साजरी केली.
मराठी कलाकारांनी रंगकर्मी या कार्यक्रमात एकत्र येत होळी साजरी केली. या कार्यक्रमात मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, गायक, गायिका इत्यादींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात एकत्र येत संपूर्ण मराठी मनिरंजन सृष्टी होळीच्या रंगात रंगलेली दिसली.