जेएनएन, मुंबई. Hemant Dhome: मराठी चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता हेमंत ढोमे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. हेमंत ढोमने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट सृष्टीतुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अश्यातच पत्नी क्षिती जोगने पतीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

क्षितीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा जोडीदारउत्साही राहा, मेहनती राहा, आनंदी रहा, मोठा हो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे राहा... या सोबतच क्षितीने पती हेमंत ढोमे सोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहे. क्षितीच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि मित्र-मैत्रिणींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहे.

हेमंत ढोमने अभिनेता म्हणून क्षणभर विश्रांती, मंगलाष्टक वन्स मोर, आंधळी कोशिंबीर, पोस्टर गर्ल, ऑनलाईन बिनलाईन, फुगे, बस स्टॉप, हिरकणी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर सतरंगी रे, पोस्टर गर्ल, फुगे, बघतोस काय मुजरा कर, झिम्मा, सनी, सातारचा सलमान या सारख्या चित्रपटांमध्ये  लेखक म्हणून काम केले आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित फसक्लास दाभाडे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई  केली. या आधी झिम्मा चित्रपटाने देखील चांगली कमाई केली. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या हुरहुन्नरी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेत्याला मराठी जागरण कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.