जेएनएन, मुंबई. Ram Navami: यंदाची श्री राम नवमी म्हणजे राम जन्मोत्सव साजरा करताना प्रत्येक भारतीयांच्या मनात एक वेगळीच भक्तीभाव पाहायला मिळणार आहे. हजारो वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत आपल्या जन्मस्थानी प्रभु श्री राम विराजमान झाले. अयोध्येत श्री राम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठपणा केल्यांनतर यंदा पहिल्यांदाच राम नवमी उत्साहात साजरी  केली जाणार आहे. त्यामुळे यंदाची ही रामनवमी विविध अगांनी विशेष आहे. श्री राम नवमीच्या पार्शवभूमीवर आम्ही तुमच्यासाठी गीतरामायण शी संबंधित काही आठवणी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया. अख्या देशाला वेळ लावणाऱ्या गीतरामायणाची निर्मिती कशी झाली.

ग.दि. माडगूळकर यांनी 1956 मध्ये 'गीतरामायण' हा मराठी भाषेतील 56 गाण्यांचा संग्रह प्रकाशित केला. हे गीतरामायण भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय प्रकाशन विभागाच्या वतीने पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले. ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले हे गीतरामायण सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले असून, भारतात 1955-56 मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्राद्वारे दूरदर्शन सुरू होण्याच्या चार वर्षांपूर्वी ते प्रसारित करण्यात आले. जायला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे गीतरामायण देशभरातील प्रेक्षकांना प्रचंड आवडेल होते. व त्याकाळी सर्वत्र ग.दि. माडगूळकर यांच्या 'गीतरामायण'ची भुरळ पडली होती.

गीतरामायण रचना
गदिमा यांच्याकडून गीत रामायणाची रचना करण्यामागची कहाणी देखील खूपच रंजक आहे. सांगितले जाते की, पुणे आकाशवाणी केंद्रासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारित करायचा होता. त्यावेळी स्टेशन डायरेक्टर असलेले सीताकांत लाड यांनी त्यांचे जवळचे मित्र ग.दि. माडगूळकर यांना आपली कल्पना सुचवली लाड यांची कल्पना गदिमांना आवडली त्यांनी वाल्मिकी रामायणावरून 'गीतरामायण' ची रचना 1956 साली केली. ग. दि.माडगूळकर यांनी श्रीराम कथेतील कथा एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केल्या आहेत. गीतरामायणात एकूण 27 व्यक्ती येतात. यामध्ये सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडून दाखविण्यात आली आहेत तर सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत दिले आहे.

पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून गीतरामायण या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन करण्यात आले. यामध्ये 1 एप्रिल 1955 या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’चे आकाशवाणी, पुणे केंद्राने प्रसारित केले. गीतरामायणात एकूण 56 गीते असून, गीत रामायणातील गीतांचे प्रसारण आकाशवाणी केंद्रावरून 1955 सालच्या रामनवमीला सुरू होऊन 1956 सालच्या रामनवमी म्हणजे 1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 या काळात प्रसारित झाले होते.