जेएनएन, मुंबई: डॉ. निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' हा शो संपल्यावर अवघ्या काही महिन्यांतच डॉ. निलेश साबळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर 27 एप्रिलपासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम सुरू होत आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कॉमेडी शोमध्ये निलेश साबळेसह भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम असे विनोदवीर झळकणार आहेत. निलेश साबळे या शो मध्ये पुन्हा एकदा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर हा शो येत्या 27 एप्रिलपासून सुरु होत्या त्यापूर्वी या शो ची संपूर्ण टीम कोल्हापुरात देवी महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचली होती. या शो चा पहिला भाग प्रसारित होण्याआधी या शो चे शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आले. कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या गीताचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,  लोटपोट हास्याची तुफान मेजवानी,
घेऊन येतेय ही अतरंगी कंपनी !!
पहा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ चे शीर्षकगीत खास तुमच्यासाठी!

27 एप्रिलपासून, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शनि आणि रवि, रात्री 9:00 वा. फक्त कलर्स मराठी वर.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये हे प्रत्येक भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे यांचे असून, यामध्ये भाऊ कदम, ओंकार भोजनेसह सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम 27 एप्रिलपासून शनिवार व रविवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.