भाऊ बहिणीतील अतुट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ भेटवस्तू देतो.
दरवर्षी हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र भद्रा काळात राखी बांधण्यास मनाई आहे.
धार्मिक कथानुसार भद्रा ही सूर्य देवाची कन्या आणि शनि देवाची बहीण आहे भद्रा ही स्वभावाने क्रोधित मानली जाते.
भद्राचा स्वभाव क्रोधित आहे म्हणून तिच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रह्मदेवाने तिला पंचांगातील व्यष्टी करण्यात स्थान दिले आहे.
भद्रा काळात शुभ व शुभ कार्य वर्ज्य आहेत त्यामुळे या काळात राखी बांधू नये असे केल्याने अशुभ फळ मिळते.
यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 06.4 मिनिटांनी भद्राकाळ सुरू होणार आहे ते 01:32 पर्यंत असेल.
अशा परिस्थितीत राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी 1.32 मिनिटे ते 4.20 मिनिटांपर्यंत असल्याने नंतर प्रदोष काळात संध्याकाळी 6.56 ते रात्री 09.8 मिनिटांपर्यंत राखी बांधता येईल.
राखी बांधताना घ्यायची काळजी व अध्यात्मशी संबंधित अशाच इतर बातम्यांसाठी वाचत राहा