फोबर्सच्या यादीनुसार एक अहवाल प्रसिद्ध केला आहे यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने जगातील दहा सर्वात धोकादायक शहरांची यादी देण्यात आली आहे जाणून घेऊया या शहरांबद्दल
व्हेनेझुएला मध्ये असलेले कराकस हे जगातील सर्वात धोकदायक शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
पाकिस्तान मधील आर्थिक संकटाशी संबंधित बातम्या रोज येत असतात आता अशा स्थितीत पाकिस्तानातील कराची शहर दुसरा क्रमांकचे धोकादायक शहर ठरले आहे ते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
सर्वात धोकादायक शहरांच्या यादीत म्यानमार मधील यंगून शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे डिजिटल सुरक्षेची स्थिती आणि गुन्हेगारीचे प्रमाण येथे अतिशय वाईट आहे.
नायजेरियामधील लागोस शहर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे या शहरात खूप गरीबी आहे यामुळे येथे लुटमार ही फार मोठी गोष्ट आहे.
फिलिपिन्स मधील मनीला शहर या यादीत पाचव्या स्थानावर आहे येथे सुरक्षा नगण्य असून त्यामुळे चोरी मारहाणीच्या बातम्या रोज एकाला मिळतात.
आपल्या शेजारील देशातील शहराचाही जगातील सर्वात धोकादायक शहरांमध्ये समावेश होतो. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरांमध्ये गरिबीमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोलंबियाची राजधानी बागोडा ही जगातील सर्वात धोकादायक शहरांच्या यादीत सातव्या स्थानी येते या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे.
इजिप्तची राजधानी कॅरो शहर या यादीत आठव्या क्रमांकावर आहे येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत खराब आहे.
फोबर्सच्या यादीनुसार मेक्सिको सिटी नव्या क्रमांकावर आहे हे शहर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अजिबात सुरक्षित नाही.
इक्केडोरची राजधानी क्विटो शहर दहाव्या क्रमांकावर आहे हे शहर दक्षिण अमेरिकेत आहे पर्यटकांनी येथे जाणे टाळावे.