फ्लेक्सिबल बॉडी हवी असेल तर योग शिवाय पर्याय नाही. योग स्ट्रेस तर कमी करतो आणि कॅलरीबर्न करण्यासाठी कार्डीओ व्हॅस्कुलर व्यायामाची ती मदत घेते.
तनिषा तिच्या व्यायाम प्रकारात पिलाटेस ना प्रामुख्याने स्थान देते ज्यात मसल्सला स्ट्रेंथ मिळते आणि फ्लेक्सिबल बॉडी सुद्धा तयार होते.
फंक्शनल ट्रेनिंग हा सुद्धा तनिषाच्या व्यायामातला महत्वाचा घटक आहे. ती फंक्शनल बरोबरच वेट ट्रेनिंग करते जसे कि, squats, lunges, इ. जेणेकरून तीची शारीरिक क्षमता वाढते.
तनिषा तिच्या जेवणात प्रथिने असलेला आहार ठेवते. प्रामुख्याने अंडी, डाळी, मासे आणि चिकन इत्यादींचा समावेश करते.
शरीराला गरजेनुसार पाणी देणे हा तनिषाचा नित्यक्रम आहे. ती स्वतःला हायड्रेट ठेवते जेणेकरून तिची पचनसंस्था व्यवस्तीत चालू राहील.