सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी: सिंधुताई सपकाळ यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती आह


By Marathi Jagran04, Jan 2025 01:11 PMmarathijagran.com

सिंधुताई सपकाळ

अनाथांची माय म्हणून सिंधुताई सकपाळ सर्वत्र परिचित आहे. सिंधुताईंनी स्वःत काबाड कष्ट करत, इतरही अनाथांना आधार दिला. आज 4 जानेवारी रोजी त्यांची तिसरी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. जाणून घेऊया सिंधुताईंच्या कुटुंबाबद्दल

सिंधुताई सकपाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यात झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा विवाह श्रीहरी सकपाळ यांच्याशी झाला. काही वर्षांनंतर कौटूंबिक वादामुळे सिंधुताईंना घरातून हाकलवून लावले

गोठ्यात मुलीचा जन्म

सिंधुताईंना घरातून हाकलवून लावले तेव्हा त्या गरोदर होत्या. कुणाच्याही मदतीविना त्यांनी गायीच्या गोठ्यात मुलगी ममताला जन्म दिला.

जगण्यासाठी संघर्ष

मुलीच्या जन्मानंतर त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु झाला. पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांनी स्म्शानात राहून चितेवर भाकरी शिजवून भूक भागवली.

अनाथ मुलांना आश्रय

स्वःतासाठी जगण्याचा संघर्ष करत सिंधुताईंनी अनाथ मुलांना देखील आश्रय दिला. 1400 पेक्षा अधिक मुलांच्या त्या आई झाल्या.

1000 नातवंडांची आजी

सिंधुताई सकपाळ यांना 207 जावई, 36 सून आणि 1000 हून अधिक नातवंडे आहेत.

पद्मश्री पुरस्कार

सिंधुताई सकपाळ यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारचा सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्काराने 2021 साली सम्मानित करण्यात आले.

सेवादायी संस्था

सिंधुताई सकपाळ यांच्या नावाने विविध 7 सेवादायी संस्था चालवल्या जातात. ज्याचा कारभार त्यांची लेक ममता सांभाळते.

महाराष्ट्राची मदर टेरेसा सिंधुताई सकपाळ यांचे 4 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.

महिला मुक्तिदिन: सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी वाक्य