शिवाजी महाराजांना सर्व मराठ्यांना एकत्र आणायचे होते. म्हणूनच, त्यांनी वैवाहिक राजकारणाद्वारे सर्व मराठा सरदारांना एकाच छत्राखाली आणले. अखेर सर्व मराठा सरदारांनी वीर शिवाजीला आपला राजा आणि संरक्षक म्हणून स्वीकारले आणि मुघल राजवटीविरुद्ध तलवारी उगारल्या.
निंबाळकर घराण्यातील सईबाई निंबाळकर या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या.फलटणचे मुधोजीराजे निंबाळकर हे सईबाईंचे वडील होते.
मोहिते घराण्यातील सोयराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सोयराबाई बहीण होत्या.
पालकर घराण्यातील पुतळाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्या बाजी प्रभू प्रधान यांच्या कन्या होत्या. राजांच्या देहावसाननंतर पुतळाबाई सती गेल्या होत्या.
गायकवाड घराण्यातील सकवारबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या. सकवारबाई गायकवाड यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत 1657 मध्ये झाला.
शिर्के घराण्यातील सगुणाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नी होत्या.
जाधव घराण्यातील काशीबाई जाधव या शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या. त्यांचा विवाह सोहळा 7 एप्रिल 1657 रोजी झाला. काशीबाई या जिजामातांच्या जाधव कुटुंबातील होत्या.
विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई विचारें या शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या.
इंगळे घराण्यातील गुणवंताबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या. 15 एप्रिल रोजी भोसल्यांशी सोयरिक होऊन गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या.