Saif ali khan: अभिनेत्याने या चित्रपटांद्वारे बनवली आपली स्वतःची ओळख


By Marathi Jagran16, Jan 2025 04:55 PMmarathijagran.com

सैफ अली खान वर हल्ला

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या घरात घुसून चाकून हल्ला केला हल्ल्यानंतर सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या वांद्रे पोलीस तपासात गुंतले आहेत.

सैफ अली खानचे चित्रपट

आम्ही तुम्हाला आजच्या लेखातून आपण जाणून घेणार की सुपरस्टार सैफ अली खानने त्याच्या कारकिर्दीत कोणते उत्तम चित्रपट करून आपली ओळख निर्माण केली.

तानाजी

2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तानाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात सैफ अली खानने उदयभान सिंग राठोड यांची मुख्य भूमिका साकारली होती जी नकारात्मक भूमिका होती या चित्रपटात सैफने अजय देवगन आणि काजोल सारख्या स्टार सोबत काम केले होते या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

गो गोवा गॉन

हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता हा एक झोंबी कॉमेडी चित्रपट आहे हे चित्रपटात अभिनेत्याने एका रशियन झोंबी हंटरची भूमिका साकारली आहे.

आदिपुरुष

सैफ अली खानने आदिपुरुष चित्रपटात लंकेशची भूमिका साकारली आहे जी प्रेक्षकांना खूप आवडली होती हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता.

लाल कप्तान

सैफ ने 2019 मध्ये रिलीज झालेल्या लाल कप्तान या चित्रपटात नागा साधूची भूमिका साकारली होती या चित्रपटातील सैफच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

एक हसीना थी

हा चित्रपट सर्वोत्कृष्ट थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सैफने नकारात्मक भूमिका साकारली होती या चित्रपटाचे खूप नाव कमावले होते.

मनोरंजनाशी संबंधित सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com

जाणून घ्या कोण आहे कथित साध्वी हर्षा रिचारिया