पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ 2025 मध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजन केले.
पंतप्रधान मोदींनी केशरी रंगाचा जॅकेट आणि निळ्या रंगाचा ट्रॅकपँट परिधान करून संगममध्ये पवित्र स्नान केले. स्नानानंतर त्यांनी विधिपूर्वक गंगाजल अर्पण करत पूजन केले.
प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यमुना नदीमध्ये बोट सफरही केली.
आज प्रयागराज महाकुंभ येथे संगमात स्नान करून पूजा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. गंगा मातेचा आशीर्वाद मिळाल्यावर मनाला अपार शांती मिळाली. सर्व देशवासियांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
महाकुंभशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com