2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले या निवडणुकीत अनेक दिग्गज विजयी झाले तर काही उमेदवारांना पराभवाला पराभवाला सामोरे जावे लागले.
या निवडणुकीत अनेक अभिनेते ही विजयी झाले आहेत आज आपण अशाच अभिनेत्याने अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवले.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उभी होती तिथून तिने प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंह यांचा 73 हजार 730 मतांनी पराभव केला.
हेमा मालिनी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. ही अभिनेत्री मथुरा मतदारसंघातून भाजपची उमेदवार होती आणि त्यांनी प्रतिस्पर्धीला दोन लाख 91 हजार मतांनी पराभूत केले.
भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी सलग तिसऱ्यांदा ईशान्य लोकसभा निवडणूक लढवत होते मनोज तिवारी यांनी कन्हैया कुमारचा एक लाख 38 हजार मतांनी पराभव केला.
भोजपुरी सुपरस्टार रवी किशन पुन्हा एकदा मैदानात विजय मिळवण्यात यशस्वी ठरले रवी किशन यांनी गोरखपुर लोकसभा मतदारसंघातून काजल निषाद यांचा एक लाख तीन हजार 724 मतांनी पराभव केला.
रामायणात रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल पहिल्यांदाच मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते तेथून त्यांनी सुमारे 1000 मतांनी विजय मिळवला.
आसनसोल लोकसभा मतदारसंघातून अभिनेता शत्रुघन सिन्हा विजय झाले आहेत शत्रुघ्न हे टीएमसी ची उमेदवार होते या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धीचा सुमारे 60000 मतांनी पराभव केला.