जाणून घ्या, हरतालिका तिजेच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता


By Marathi Jagran03, Sep 2024 05:19 PMmarathijagran.com

हरतालिका तिज

सनातन धर्मात तिजचे विशेष महत्त्व आहे महिला या दिवशी उपवास करतात. जाणून घेऊया हरतालिका तिजची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे.

हरतालिका तीज कधी असते

पंचांगानुसार यावर्षी हरतालिका तिज 6 सप्टेंबर 2024 रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत आणि पूजा करतात.

हरतालिका तीज पूजेचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार हरतालिका तीजे पूजेच्या शुभ मुहूर्त सकाळी 6.02 ते 8.33 पर्यंत असेल या काळात पूजा केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील.

भगवान शिव व माता पार्वतीची पूजा

हरतालिका तिजला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते.

हरतालिका तीजला या गोष्टी अर्पण करा

या दिवशी पूजा करताना फळे, फुले, मिठाई, हार, दुर्वा, बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.

शृंगार करा

हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करावेत त्यामुळे माता-पार्वती प्रसन्न होते आणि जीवनात आनंद मिळतो याशिवाय पार्वतीला सुद्धा अलंकार अर्पण करावेत.

हरतालिका पूजेला मंत्राचा जप करावा

या दिवशी ओम नमः शिवाय,ओम पार्वताय नमः, ओम जगदात्रय नमः या मंत्राचा जप करावा असे केल्याने माता पार्वतीच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो.

वैवाहिक जीवनात गोडवा

हरतालिका तिजच्या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो या सोबतच पती-पत्नीचे नाते ही घट्ट होते.

वर्षभरातील सण आणि विशेष तारखा जाणून घेण्यासह अध्यात्मशी संबंधित सर्व बाबींसाठी वाचत रहा.

प्रदोष व्रताच्या दिवशी या नियमांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, महादेव होतील संतप्त