जाणून घ्या सूर्य देवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत


By Marathi Jagran05, Jun 2024 03:01 PMmarathijagran.com

सूर्य देवाची पूजा

सूर्य देवाचे विशेष महत्त्व आहे सूर्य देवाची उपासना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात.

सुख आणि समृद्धी

रोज सूर्यदेवाला जर अर्पण केल्याने सुख-समृद्धी आणि मानसम्मान वाढतो मात्र सूर्य देवाला जल अर्पण करताना काही नियम लक्षात ठेवावेत.

अखंड फुले पाण्यात मिसळून अर्पण करावी

सूर्य देवाला जल अर्पण करताना पाण्यात अखंड फुल, हळद, गूळ, लाल चंदन, अर्पण करा असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद प्राप्त होतात.

सूर्य देवाला नमस्कार

यानंतर सूर्याला नमस्कार करून मंत्र उच्चार करताना जल अर्पण करावे यानंतर सूर्य देवाची आरती करावी.

सूर्य देवाची पूजा

यानंतर सूर्य देवाची पूजा करावी सूर्य देवाची पूजा करताना धूप दिवा आणि कापूर यांनी आरती करावी असे केल्याने सूर्य देवाची कृपा प्राप्त होते.

नारळ फळे आणि मिठाई अर्पण करा

सूर्य देवाची पूजा करताना नारळ फळे आणि मिठाई अर्पण करा आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करा हा उपाय केल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात.

लक्षात ठेवा हे नियम

सूर्यदेवाला जल अर्पण करताना पायावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे.

सूर्यदेवाला जल अर्पण करताना हे नियम लक्षात ठेवावेत धर्म आणि अध्यात्मशी संबंधित अशा इतर बातम्यांसाठी वाचत रहा JAGRAN.COM

कुंडलीतील हे तीन ग्रह बलवान असतील तर राजकारणात मिळेल यश