अक्रोड भिजवल्यानंतर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर का मानले जाते, अक्रोड खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात जाणून घेऊया.
यामध्ये ओमेगा 6 ,फॅटी ॲसिड, कॅल्शियम ,आयर्न ,पोटॅशियम, फोल्ड मॅग्नेशियम, प्रोटीन आणि फायबर असते.
अक्रोड रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा
हे खाल्ल्याने टाईप 1 मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते.
जर तुमच्या शरीरात सूज येण्याची समस्या असेल तर अक्रोड भिजवून खावे, त्यामुळे सूज येण्याची समस्या दूर होते.
भिजवलेल्या अक्रोडात मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आढळतात आणि ते खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी अक्रोड पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.