सनातन धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. जया एकादशीला काय खाऊ नये ते जाणून घेऊया
यावेळी जया एकादशी 8 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने जीवनात सुख समृद्धी येते.
पंचांगानुसार एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9. 26 मिनिटांनी सुरू होईल तर 8 फेब्रुवारी रोजी आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपेल
या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी जया एकादशीच्या उपवासात खाण्यापिण्याचे अनेक गोष्टी टाळल्या पाहिजेत
जया एकादशीला उपवास करणाऱ्या भाविकांनी लसूण आणि कांदा खाणे टाळावेत त्यामुळे उपवास मोडतो आणि पूजेचे फायदे मिळत नाही
जया एकादशीच्या दिवशी मसूर खाऊ नये असे म्हटले जाते हे खाल्ल्याने भगवान विष्णू क्रोधीत होतात आणि दारिद्र्य येऊ लागते.
जया एकादशीला चुकूनही मांसाहार करू नये याशिवाय उपवास करणाऱ्या भाविकांनी अन्न आणि मीठ खाणे टाळावे
या दिवशी उपवास करणारे भाविकांनी गोड बटाटे,दूध दही आणि फळे खावीत हे खाल्ल्याने उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात.
अध्यात्मशी संबंधित सर्व बाबींसाठी वाचत राहा marathijagran.com