राखी मध्ये किती गाठी बांधाव्यात


By Marathi Jagran16, Aug 2024 05:59 PMmarathijagran.com

रक्षाबंधन सण

भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन सण साजरा केला जातो जाणून घेऊया राखी बांधताना किती गाठी बांधाव्यात.

रक्षाबंधन कधी आहे

यावर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देते.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

19 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी 01:32 ते 4.20 पर्यंत आहे यानंतर प्रदोष काळ संध्याकाळी 6.56 ते 09.8 पर्यंत असतो.

राखी मध्ये किती गाठी बांधल्या जातात

राखी बांधताना अनेक भगिनींच्या मनात प्रश्न पडतो की किती गाठी बांधायचे राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते.

गाठी बांधण्याचा अर्थ

राखी मध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या बळकटीसाठी बनली जाते.

देवतांना समर्पित

राखीच्या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित केला जातात त्यामुळे भाऊ बहिणीचे नाते ही घट्ट होते.

कोणत्या हातावर राखी बांधायची

राखी नेहमी उजव्या हाताला बांधावी यामुळे आजारांपासून आराम मिळतो आणि भावाला सौभाग्य प्राप्त होते.

वर्षभरातील सण आणि विशेष तारखा जाणून घेण्यासह अध्यात्मशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा jagran.com

रक्षाबंधनाला करा अशी सोपी केशरचना दिसाल सुंदर