शरीरातील प्रत्येक भागाला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी रोज योग, धावणे किंवा साध्यापद्धतीने चालण्याने सुद्धा शरीर ऍक्टिव्ह राहते. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करा.
उत्तम आरोग्य हे आहारावर अवलंबून असते, म्हणून पौष्टिक आहार शरीराला आवश्यक nutrient-rich घटक मिळवून देतात त्यामुळे संतुलित आहार हा महत्वाचा घटक आहे.
आहार आणि व्यायाम जसा गरजेचा आहे त्याप्रकारे पुरेशी झोप घेणं हे देखील तेवढच गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी ७ ते ८ तास झोप आपल्या मेंटल रिकव्हरीसाठी गरजेची असते.
सध्याच्या धावपळीच्या युगात स्ट्रेस मॅनजेमेंट करणे हे फार महत्वाचे आहे. ध्यान करणे किंवा दीर्घ श्वसनाचे व्यायाम असो, आपल्या स्ट्रेस वर उपाय करण्यासाठी या प्रकारचे उपाय आपण करून समतोल राखू शकतो.
मानव हा समाजशील प्राणी आहे आणि मानवाच्या जीवनात नातेसंबंधांना खूप महत्व आहे, म्हणून आपल्या सभोवताली सकारात्मक नातेसंबंधी लोक असतील तर जीवन सुखकर होते. त्यामुळे सकारात्मक विचार करणाऱ्या मित्र आणि कुटुंबासोबत रहा आणि आनंदी जीवन बनवा.
आपल्या मेंदूला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी पुस्तक वाचली पाहिजे, नवीन छंद जोपासले पाहिजे, सतत वेगवेगळ्या गोष्टी केल्याने आपल्या ज्ञानातही भर पडते. त्यामुळेच सातत्याने शिकत रहा.
समाजात वावरताना आपण आपले विचार, भावना आणि सभोवतालची जाणीव राखली पाहिजे आणि त्याचबरोबर विनम्र राहील पाहिजे. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधुन आनंद मिळवला पाहिजे. सकारात्मक गोष्टींचे कौतुक किंवा त्याचा आदर केला पाहिजे.
ध्येय ठरवताना ते साध्य करण्यायोग्य असले पाहिजे तरच ते करण्याची ऊर्जा आणि दिशा मिळते. आपले मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला छोट्या स्टेप्स मध्ये विभाजित करा, आणि छोटे ध्येय प्राप्तकरून यश साजरे करत तुम्ही तुमचे मुख्य ध्येय प्राप्त करू शकता.