कॅल्शियम,प्रोटीन आणि हेल्दी फॅक्ट यासारखे आवश्यक बहुपोषक घटक दुधात मूल्य प्रमाणात आढळतात हे एखाद्या सुपरफुड पेक्षा कमी नाही.
दूध प्यायलाने कमकुवत हाडांना जीवनदान मिळते स्नायू मजबूत होतात शरीर सक्रिय राहते.
जास्त प्रमाणात काही खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो दुधाच्या बाबतीतही असेच काही घडते.
आज आपण जाणून घेणार आहोत की एका दिवसात किती दूध प्यावे जेणेकरून तुमच्या आरोग्य चांगले राहील.
युनायटेड स्टेटमधील प्रौढांसाठी राष्ट्रीय आहार मार्गदर्शक तत्वे शिफारस करतात की, प्रौढ व्यक्तीने दररोज तीन कप म्हणजेच 750 मिली दूध प्यावे.
प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजा नुसार हे प्रमाण वाढू किंवा कमी होऊ शकते याची काळजी घेतली पाहिजे.
सर्दी,खोकला,अपचन, जुलाब, त्वचा विकार अशा परिस्थितीत दूध अजिबात पिऊ नये.
ज्या लोकांना दुधाचे दुधाची ऍलर्जी असते ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात दूध पिणे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जेव्हा तुम्ही दूध प्याल तेव्हा त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या जीवनशैलीशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा.