हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि या दिवशी गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली. बौद्ध लोकांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विधीनुसार सत्यनारायणाची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या कपड्यात अक्षत ठेवून तिजोरीत ठेवल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते.
या दिवशी भगवान बुद्धाची पूजा करा यासोबतच भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांचीही पूजा करावी.
गौतम बुद्ध हा भगवान विष्णूचा नववा अवतार मानला जातो, त्यामुळे या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पाण्यात दूध टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.