अंबानी कुटुंबातील अशी अनेक जोडपी आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना जास्त माहिती नाही. कारण हे जोडपे फारसे प्रसिद्ध नाहीत पण, तरीही ते या कुटुंबासाठी महत्वाचे आहेत, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
आकाश आणि श्लोका हे 2019 मध्ये भारतातील सर्वात चर्चित जोडपे होते. आकाश आणि श्लोका हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि लव स्टोरीही खूप खास आहे.
मुकेश अंबानी यांनी अंबानी कुटुंबाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्याचप्रमाणे नीता अंबानी यांनीही त्यांची साथ दिली. दोघांनी 8 मार्च 1985 रोजी लग्न केले. त्यांची प्रेमकहाणी देखील खूप खास आहे. ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबवून मुकेशने नीताला प्रपोज केले.
ईशा आणि आनंद पिरामल यांचे लग्न 2018 मध्ये झाले होते. ईशा ही मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी आहे. ईशा आणि आनंद यांना पॉवर कपल म्हटले जाते. ईशा ही रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर काम करते. तर आनंद पिरामिड हे पिरामल इंडस्ट्रीजचे काम हाताळते.
रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी आणि माजी अभिनेत्री टीना अंबानी यांचा विवाह 1991 साली झाला होता. टीना सोबत लग्न करण्यासाठी अनिल यांना आपल्या कुटुंबांना मनवावे लागले होते. टीना चित्रपटात काम करत असल्याने धीरूभाई अंबानी या लग्नासाठी तयार नव्हते. अनिलला जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी अशी दोन मुले आहेत.
धीरूभाई अंबानी यांची मुलगी दीप्ती हिचे लग्न दत्तराज सालगावकर यांच्याशी 1983 मध्ये झाले होते.त्यानंतर हे जोडपे गोव्यात शिफ्ट झाले.या दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या कपलमध्ये 5 वर्षे रिलेशनशिप होते.
कोठारी शुगर अँड केमिकल लिमिटेडचे प्रमुख श्याम कोठारी यांचे लग्न 1986 मध्ये झाले. वयाच्या ५४ व्या वर्षीच श्याम कोठारी यांचे निधन झाले. कोठारी यांनी सुमारे वर्षभरापूर्वी देशातील पहिला म्युच्युअल फंड सुरू केला होता.
दीप्ती आणि दत्तराज सालगावकर यांची मुलगी इशिता हिचा विवाह नीरव मोदीचा धाकटा भाऊ निश्चल मोदी याच्याशी 2016 मध्ये गोव्यात झाला होता. इशिता आणि निश्चल यांची एंगेजमेंट मुकेश अंबानी यांच्या घरी अँटिलीयामध्ये झाली. ज्याला बॉलिवूड आणि राजकीय जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती.
आणखी अश्याच स्टोरीसाठी जागरणशी कनेक्ट राहा.