दसरा दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो या दिवशी रामाने लंकापती रावणाचा वध केला होता.
रामाने लंकेवर विजय मिळवला होता दसरा हा सण वाईटावर चांगला विजयाचे प्रतीक मानला जातो याला विजयादशमी असेही म्हणतात.
यावर्षी दसरा शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे शनी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी यंदाचा दसरा ही खास आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे दसऱ्याच्या दिवशी केल्याने शनी देवाला प्रसन्न करता येते या उपायांबद्दल जाणून घेऊया.
या दिवशी घराच्या उत्तर पूर्वेला शमीचे रोप लावावे यामुळे शनीदोष, शनीची महादशा आणि साडेसाती पासून आराम मिळतो.
घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मकता वाढेल कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कामात यश मिळेल पैशांची आवक वाढेल.
दसऱ्याच्या दिवशी मोहरीच्या तेलात तीळ मिसळून दिवा लावावा यामुळे शनीच्या क्रोधापासून आणि अशुभ परिणामांपासून आराम मिळतो.
दसऱ्याला हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होऊ शकतात अध्यात्माशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा.