Delhi CM: या महिलाही राहिल्या आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री


By Marathi Jagran20, Feb 2025 12:11 PMmarathijagran.com

27 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सरकार स्थापन करणाऱ्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी रेखा गुप्ता यांना त्यांच्या नेत्या म्हणून निवडले आहे. रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहे.

या महिला राहिल्या आहेत मुख्यमंत्री

रेखा गुप्ता यांनी विद्यार्थी राजकारणातून दिल्लीच्या सत्तेच्या शिखरावर पोहोचले आहे. रेखा दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील. त्यांच्या आधी भाजपच्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि आप नेत्या आतिशी यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

शीला दीक्षित

काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिलच्या मुख्यमंत्री म्हणून 3 डिसेंबर 1998 ते 28 डिसेंबर 2013 या काळात 15 वर्षे 25 दिवस मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

सुषमा स्वराज

भाजप नेत्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. सुषमा स्वराज या 12 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 या काळात मुख्यमंत्रीपदी होत्या.

अतिशी

आम आदमी पक्षाच्या या देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत त्यांनी 21 सप्टेंबर 2024 ते 20 फेब्रुवारी 2025 या काळात मुख्यमंत्री पद भूषविले आहे.

रेखा गुप्ता

भाजपच्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून 20 फेब्रुवारी 2025 रोजी शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहे.

राजकारणाशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा MARATHIJAGRAN.COM

अर्थसंकल्प 2024 सरकारने रोजगाराशी संबंधित केल्या आहेत या मोठ्या घोषणा