पनीर आणि मूग डाळ एकत्र खाणे परिपूर्ण आहार असू शकतो मूग डाळीमध्ये प्रथिने आणि फायबर मुक्त प्रमाणात असते त्याचप्रमाणे पनीरमध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी असते या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे आज जाणून घेणार आहोत.
मूग डाळ लवकर पचते आणि पोटाला आराम देते त्याचबरोबर पनीरमध्ये असलेले प्रोटीन पचनक्रिया सुधारण्यास मदत करते दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोटाचा त्रास होत नाही.
पनीरमध्ये असलेले प्रथिने,अमिनो ऍसिड स्नायूंना मजबूत करतात मूग डाळीमध्ये प्रोटीन देखील असते जे शरीराला ऊर्जा आणि स्नायू देण्यास मदत करते.
मूग डाळ आणि पनीर हे कमी कॅलरी असलेले अन्न आहे जे वजन कमी करण्यास मदत करते मूग डाळीमध्ये फायबर असते त्यामुळे ती खाल्ल्याने भूक कमी होते.
पनीरमध्ये असलेले कॅल्शियम आणि मूग डाळीचे जीवनसत्वे हाडांच्या आरोग्य सुधारतात या दोन गोष्टी खाल्ल्याने एस्टीओपोरायसिस सारख्या समस्या दूर राहतात.
मूगडाळ आणि पनीरमध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांनाही निरोगी बनवतात हे कॉम्बो केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
मूग डाळ आणि पनीर एकत्र खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते मूगमध्ये फॉलिक ऍसिड आणि पनीर असलेले पोषक तत्व शरीराला संसर्ग टाळण्यास मदत करते.
मुगाची डाळ आणि पनीरचा कॉम्बो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठीच फायदेशीर आहे त्याचा आहारात समावेश करा आणि निरोगी रहा अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com