जेएनएन, कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळ (Kolhapur Airport) परिसरात आज सकाळपासून प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानतळाच्या पाठीमागील बाजूस तामगावकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता विमानतळ प्राधिकरणाने दीड वर्षांपूर्वी अचानक बंद केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विमानतळाकडे मोर्चा काढला.
तातडीने बंदोबस्त वाढवला
शेकडो ग्रामस्थांचा जमाव अचानक विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे धाव घेत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवत बॅरिकेड्स उभारून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नागरिककडून घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. विमानतळ परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
पर्यायी मार्ग दिला नसल्याची तक्रार
मोठा रस्ता अडवून गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रशासनाने कुठलाही पर्यायी मार्ग दिला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. अचानक रस्ता बंद झाल्यामुळे शाळा-कॉलेज, नोकरी, शेतकाम, रुग्णवाहिका सेवा यांना गंभीर अडथळा निर्माण झाले आहेत. या मनमानीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी विमानतळाच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी केली.
काही आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना रोखलं, त्यामुळे वातावरण आणखी ताणलं.
