विनोद राठोड, रायगड: Maharashtra Politics: रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये शिवसेनेला एकाकी पाडण्याचे काम तटकरे कुटुंब करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. दळवी यांनी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना थेट इशारा दिला आहे.
“भाजपची भूमिका नेहमीच राष्ट्रवादीला सोबत घेण्याची आहे. पण त्यामुळे आम्हाला मागे सारण्याचा प्रयत्न झाला तर आम्हीही यापेक्षा भारी प्रयोग करू शकतो.” असे वक्तव दळवी यांनी केले आहे.
यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे. रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिवसेना समीकरणाबाहेर फेकली गेली आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिकेत तटकरे यांनी भाजपसोबतची आघाडी जाहीर करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चाल अजित पवार गटाने खेळली आहे. यामुळे शिवसेनेवर त्याचा मोठा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित दिसणार आहे.
तटकरे कुटुंब महायुतीत खोडा घालत असल्याचा आरोप करत दळवी म्हणाले की, शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. यामुळे आगामी नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
रायगडमध्ये भाजप–राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिवसेनेच्या नाराजीत भर पडली असून दळवींच्या इशाऱ्यानंतर पुढील काही दिवसांत मोठे राजकीय फेरबदल घडू शकतात, अशीही चर्चा आहे.
