जेएनएन, नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह वादावर अंतिम सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी ठेवली आहे.
एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. मात्र, न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.
आता ही सुनावणी पुढच्या वर्षी होणार आहे. म्हणजेच, सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारी 2026 रोजी ठेवली आहे.
2 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (UBT) या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणी थेट जानेवारीत ठकलल्याने ठाकरे गटाला आणखी वाट पाहावी लागणार आहे.
शिवसेना पक्षात उभी फूट
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय देताना शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यावर सुप्रिम कोर्टात वाद सुरु आहे. यावर आता अंतिम सुनावणी होणार आहे.
धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता आशा मावळली आहे. धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
