मुंबई, (एजन्सी). Seawoods-Darave station Rename : रेल्वे मंत्रालयाने नवी मुंबईतील सीवुड्स-दारावे स्टेशनचे नाव बदलून सीवुड-दारावे-कारावे असे केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. सीवूड्स हे जवळच्या निवासी सोसायटीचे नाव आहे, तर दारावे आणि कारावे ही दोन लगतच्या गावांची नावे आहेत.
नवी मुंबईला महानगराशी जोडणाऱ्या हार्बर लाईन स्टेशनचे नाव बदलण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून करण्यात आले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
"नाम बदलल्यानंतर, स्थानकाचा कोड SWDV वरून SWDK मध्ये बदलला आहे," असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.

सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या -
यावर्षी ऑक्टोबरपासून सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर नवीन रेल्वे ट्रेन सुरु केल्या आहेत. या रेल्वे मार्गावर नवीन 20 रेल्वे फेऱ्यांचा समावेश केला असून त्यात 10 अप आणि 10 डाउन अशा अतिरिक्त रेल्वे फेऱ्यांचा वेळापत्रकामध्ये समावेश केला केला आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे फेऱ्यांची संख्या लवकरच 40 वरून 60 पर्यंत गेली आहे. सध्या सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर दर एक तासाने रेल्वे धावत आहे.
