जेएनएन, मुंबई: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना (Maharashtra Nagar Panchayat Election 2025) मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक जिल्ह्यांत समाधानकारक मतदानाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी शांततेत मतदान सुरू असून प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

नांदेड : 2 वाजेपर्यंत 27% मतदान

नांदेड जिल्ह्यात सकाळीच मतदारांनी मतदान केंद्रांकडे गर्दी केली. 11.30 वाजेपर्यंत सरासरी 19.95 टक्के मतदानाची नोंद झाली. ग्रामीण आणि शहरी भागांतही मतदार उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत असल्याचे चित्र आहे. तर 2 वाजेपर्यंत 27% मतदान झाले आहे. 

सांगली : नगरपरिषद व नगरपंचायतीत 34.77% मतदान 

सांगलीतील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीदुपारी 2.30 वाजेपर्यंत 36 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी रांगा दिसल्या तर काही केंद्रांवर मतदानाचा वेग सुरुवातीला मंद होता. मात्र वेळ जसजसा पुढे सरकत आहे तसतसा मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. 

उरण नगरपरिषद : सहा तासांत 37.5% मतदान 

    रायगडमधील उरण नगरपरिषद निवडणुकीतही मतदारांचा चांगला सहभाग पाहायला मिळत आहे. सकाळी चार तासांतच म्हणजे 11.30 वाजेपर्यंत 21.5 टक्के मतदान झाले. सुरक्षा दल आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारांना सुकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    भंडारा : पवनी नगरपरिषदेत 38.22% मतदान 

    भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरपरिषदेत 11.30 वाजेपर्यंत 20.22 टक्के मतदानाची नोंद आहे. शहरातील बहुतेक केंद्रांवर मतदान शांततेत सुरू आहे.  

    लातूर जिल्हा : दुपारी अडीचपर्यंत सरासरी 35% मतदान

    लातूर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या मतदानातही सकाळपासून उत्साहाचे वातावरण दिसले. एकूण सरासरी मतदानाचा टक्का 35 % असा आहे.

    नगरपरिषदानुसार प्रमुख टक्केवारी 

    1. औसा – 36.88% (सर्वाधिक मतदान) औसा नगरपरिषदेत मतदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान इथे नोंदले गेले.  
    2. उदगीर – 32% मतदान उदगीरमध्येही सकाळपासून स्थिर मतदान झाले असून 11.30 पर्यंत 22 टक्के मतदानाची नोंद आहे. 
    3. अहमदपूर – 38.99% मतदान अहमदपूर नगरपरिषदेत जवळपास 38 टक्के मतदान झाले असून मतदार शांततेत मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहेत.

    राज्यातील बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून निवडणूक अधिकाऱ्यांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.