जेएनएन, मुंबई. Maharashtra Municipal Council Election 2025: नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
1 डिसेंबर रोजी रात्री तोफा थंडावणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल.
या गोष्टी करता येणार नाहीत
त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker) वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.
मुख्यमंत्र्यांचा आजचा प्रचार दौरा विदर्भात
- सकाळी 11.50 वाजता : जाहीर सभा, यशवंतराव शिंदे महाविद्यालय मैदान, भद्रावती, चंद्रपूर जिल्हा
- दुपारी 1.35 वाजता : जाहीर सभा, मार्लीवार प्रांगण, शिवाजी महाविद्यालयाच्या बाजुला, धानोरा रोड, गडचिरोली
- दुपारी 3.15 वाजता : जाहीर सभा, दसरा मैदान, भंडारा
- दुपारी 4.30 वाजता : जाहीर सभा, नेहरु मैदान, तुमसर, जिल्हा भंडारा
- सायं. 6.15 वाजता : जाहीर सभा, आदर्श सिंधी स्कुल मैदान, सिंधी कॉलनी, गोंदिया
उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये तळ ठोकून
- सकाळी 11 वाजता : प्रचारसभा, वैष्णवी मंगल कार्यालय, केसापुरी कॅम्प,माजलगाव जि. बीड
- दुपारी 1 वाजता : प्रचारसभा, छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल,धारूर, जि. बीड
- सायंकाळी 5.15 वाजता : बीड शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक,वकील व इतर प्रतिष्ठित नागरिक यांचा मेळावा
- सायंकाळी 6.30 वाजता : प्रचारसभा, बशीरगंज, बीड
- रात्री 8.30 वाजता : प्रचारसभा, बाजारतळ, गेवराई, जि. बीड
हेही वाचा - आयआयटी नामांतरचा मुद्दा गाजला; राम नाईक यांनी जितेंद्र सिंग यांचे वक्तव्य मागे घेण्याचे सांगितले
