जेएनएन,कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर शिरोळ मतदारसंघातून लढणारे माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिंदे गटाची साथ पकडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत अधिकृतरीत्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 राजू शेट्टींच्या घोषणेनंतर बदलले समीकरण
काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीसोबत नगरपरिषद निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे संघटनेची राजकीय दिशा स्पष्ट झाली होती. पण या घोषणेनंतर लगेचच उल्हास पाटील यांनी संघटनेपासून वेगळी भूमिका घेत शिंदे गटात ज्यांची भूमिका घेतली.

यड्रावकर – पाटील यांची भेट
उल्हास पाटील यांनी शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत चर्चा केली.  

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी धक्का
मागील अनेक दिवसांपासून  संघटनेला अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत.